`

Ticker

6/recent/ticker-posts

पवार , ओबीसी आरक्षणामध्ये ठाकरे , थोरात झारीतील शुक्राचार्य

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सत्ताकाळातच केंद्राने ३ जुलै २०१५ रोजी पत्र पाठवले . इम्पेरिकल डाटात ६ ९ लाख चुका झाल्या होत्या . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारे ओबीसींना आरक्षण दिले होते . यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता . मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही राज्य सरकारने लक्ष दिले नाही . राज्यातील महविकास आघाडी सरकार झोपले असून केवळ सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळेच आरक्षण गेले असल्याचा आरोप बावनकुळे यांनी इम्पेरिकल डाटात झालेल्या चुका या युपीए सरकारच्या काळात झालेल्या आहेत . त्यांच्या काळात चुका झाल्यानंतरही काँग्रेस , राष्ट्रवादीचे नेते खोटे बोलत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना केली . यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर आरोप करतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही शरसंधान साधले . " 

ओबीसी आरक्षणाच्या बाजूने विजय वडेट्टीवार बोलतात . छगन भुजबळ मोर्चे काढतात , पण मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार बोलत नाहीत . शरद पवार , बाळासाहेब थोरात , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरका चालक आहेत , ओबीसी आरक्षण मिळावे असे त्यांना वाटत नाही ते झारीतील शुक्राचार्य आहेत असा आरोप करताना त्यांना जर खरंच आरक्षण द्यायचे असेल तर मग त्यांनी तसे जाहीर करावे . तीन महिन्यांत डाटा तयार करून आरक्षण द्यावे , भाजपच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करू अन्यथा पुढील काळात रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला .

Post a Comment

0 Comments