`

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक अभियानाचा प्रारंभ करताना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश


 भारतीय जनता पार्टीचे उद्दिष्ट केवळ निवडणुका लढवून सत्तेचे राजकारण करण्याचे नाही . आपल्या पक्षाला सेवा कार्याचा , समाजसेवेचा मोठा वारसा लाभला आहे . हा वारसा लक्षात घेऊनच आपण राष्ट्रीय आरोग्य स्वयसंवेक अभियान सुरू करत आहोत . या अभियानाद्वारे कोरोना प्रसाराला अटकाव करण्याचे काम आपल्या पक्षाचे स्वयंसेवक करणार आहेत . यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण या अभियानाद्वारे दिले जाईल . या अभियानातून चार लाख आरोग्य स्वयंसेवक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे . या स्वयंसेवकांद्वारे दोन लाख खेड्यांपर्यंत पोहचून तेथे आवश्यक असलेल्या आरोग्य सेवा पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल . आतापर्यंत या अभियानासाठी ४८ हजार कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे . सत्ता हे ध्येय नसून जनतेच्या सेवेसाठी आपण राजकारणात उतरलो आहोत , याची जाणीव पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवायला हवी . या अभियानातून तयार झालेले स्वयंसेवक खेडो - पाडी जावून कोरोना विषयी जागृती निर्माण करतील . त्याचबरोबर या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार देण्यासाठी हे स्वयंसेवक कार्यरत होतील . प्रत्येक स्वयंसेवकाजवळ ' हेल्थ कीट ' असणार आहे . या कीटमध्ये ऑक्सीमीटर , थर्मामीटर , रॅपिड अँटीजेन चाचणी साहित्य तसेच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा समावेश असेल .

Post a Comment

0 Comments